Pune APMC Election Update : पुणे जिल्ह्यातील नऊ बाजारसमित्यांसाठी आज रोजी मतदार होत आहे़. यामध्ये हवेली, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, मंचर आंबेगाव, नीरा पुरंदर, खेड, तळेगाव दाभाडे आणि मावळ या बाजार समित्यांचा समावेश आहे. यात खेडमध्ये आजच मतमोजणी होणार आहे. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात उरतले आहेत. हवेली बाजार समितीची निवडणूक ही तब्बल 20 वर्षांनंतर होत आहे, यामुळे चुरस निर्माण झाली आहे.
हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून 11 जागांसाठी 29 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये सेवा सहकारी संस्था सर्व सर्वसाधारण गटातून 7 जागांसाठी 21 उमेदवार, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून 2 जागांसाठी 4 उमेदवार, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग गटातून 1 जागेसाठी 2 उमेदवार, सेवा सहकारी संस्था विमुक्त भटक्या जातीमधून 1 जागेसाठी दोन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून चार जागांसाठी 11 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून 2 जागांसाठी 6 उमेदवार, ग्रामपंचायत अनुसुचित जाती जमाती गटातून एक जागेसाठी 3 उमेदवार, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून 1 जागेसाठी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. व्यापारी आडते मतदार गटातून 2 जागांसाठी 12 उमेदवार, हमाल तोलणार गटातून एका जागेसाठी पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी तब्बल 57 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील नशीब आजमवणार...
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढताना दिसते आहे. पुणे जिल्ह्यात मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फारकत घेतल्याचं दिसून येत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते स्वतः नशीब आजमावत आहेत. अशावेळी सर्वपक्षीयांनी त्यांच्या विरोधात मोट बांधली आहे. तरी ही त्यांनी एकतर्फी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
मतदानावेळी पावसामुळे तारांबळ
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी पावसाने हजेरी लावल्याने मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बारामतीसह पुरंदर भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. बारामतीत 17 जागांसाठी मतदान होत आहे. तर इंदापूरमध्ये 14, दौंडमध्ये 18 तर नीरामध्ये 16 जागांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाने हजेरी लावण्याने मतदारांची तारांबळ उडाली. या निवडणुकीत अजित पवार, राहुला कुल आणि विजय शिवतारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुण्यातील मतदान केंद्रावर गोंधळ
पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत बनावट मतदान होत असल्याच्या आरोपांमुळे शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर प्रचंड गोंधळ सुरु झाला होता.