ABP C Voter Survey On Eknath Shinde: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार समोर येत आहेत. शिवसेनेतून बंड करत भाजपच्या (BJP) साथीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पदी विराजमान झाले. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा पहिला अंक रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे असं वातावरण पाहायला मिळालं होतं. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष एकनाथ शिंदेंवर होतं. अशातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेचा विषय बनले आहेत. 


एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागेल, अशी राजकीय शक्यता महाराष्ट्रात वर्तवली जात आहे. केवळ शक्यताच नाहीतर अनेक नेत्यांकडून लवकरच शिंदे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच एकनाथ शिंदे पायउतार झाले तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्नही सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. या प्रश्नावर बोलताना लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


शिंदे पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण?



उद्धव ठाकरेंबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती


एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनाच जनतेची पहिली पसंती असल्याचं सी-व्होटरच्या सर्वेक्षणाच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. 26 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे. तर 11 टक्के लोकांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून आपली निवड केल्याचं सांगितलं आहे. मात्र, 35 टक्के लोकांना मुख्यमंत्री कोणी व्हावं याबाबत काहीच अंदाज नसल्यामुळे त्यांनी शिंदे पायउतार झाल्यास त्यांच्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी विराजमान व्हावं हे भविष्यावर सोडलं आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तेव्हापासूनच जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. सी-व्होटरच्या सर्वेक्षणातूनही तेच समोर आलं. त्यामुळे सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार जनतेला उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे.


सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. जलद राजकीय प्रश्नांवर ऑल इंडिया सर्वे सोमवार (24 एप्रिल) ते बुधवार (26 एप्रिल) या कालावधीत करण्यात आला. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ABP C Voter Survey: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले तर, पुढची राजकीय समीकरणं काय? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे