बारामती म्हणजे पवार घराण्याचा बालेकिल्ला. पुण्यात पिछेहाट झाल्यास भविष्यात राष्ट्रवादीवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो.
39 सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे. पहिल्या टप्प्यातील 164 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे औरंगाबादमध्येही महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी अर्ज भरले असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पहिल्या टप्प्यात काय?
पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत.
नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे. 27 नोव्हेंबर रोजी 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं.
भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. काँग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बऱ्यापैकी यश मिळालं आहे. कारण त्यांचीही 25 नगरपालिकांवर सद्दी असणार आहे. तर त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल 34 आहे.
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेना 25 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेसचे 22 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. आतापर्यंत 17 ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालं आहे, तर 25 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्ष आणि अपक्षांकडे गेलं आहे.
146 पालिकांमध्ये सत्ता कोणाची
भाजप - 31
काँग्रेस - 20
राष्ट्रवादी - 17
शिवसेना - 16
स्थानिक आघाडी - 25
त्रिशंकू- 34
शेकाप -2
भारिप- 1