सातारा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला, या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. सबंध देशभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. भारताने याचा बदला घ्यावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे. परंतु साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मात्र मवाळ भूमिका घेतली आहे.


उदयनराजे म्हणाले की, "हल्ल्याचा बदला घ्यावा, असं सर्वजण बोलत आहेत. परंतु बदला कोणाच्या विरोधात घेणार? त्यांनी (दहशतवाद्यांनी) भ्याड कृत्य करु नये. यातून साध्य काय होणार? आपण त्यांना मारायचं, त्यानंतर त्यांनी आपल्याला मारायचं, यामुळे काय होणार आहे? दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले, याचे मला वाईट वाटते, त्यांच्या कुटुंबातली पोकळी आपण भरुन काढू शकणार नाही."

मवाळ भूमिका घेत राजे म्हणाले की, "हा मुद्दा सामोपचाराने मिटला पाहिजे. संपूर्ण जगाक शांतता प्रस्थापित झाली पाहिचे."