Maharashtra Legislative Session 2025 : विधान परिषदेच्या ( Legislative Council) कामकाजावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपसभापतींच्या समर्थनार्थ कुठल्या नियमाखाली विश्वास प्रस्ताव आणला? अविश्वास प्रस्तावासाठी नियम असतील तर विश्वास प्रस्तावाचे काय? असा सवाल विरोधकांनी केला. प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) मांडलेल्या प्रस्तावावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला आहे. कामकाज चुकीच्या पद्धतीने केल्याचा सभापती राम शिंदे (Ram Shinde) आणि तालिका सभापती चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर विरोधकांकडून आरोप करण्यात आला आहे. एकाकी पद्धतीने तालिका सभापती काम करत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, तालिका सभापतींनी रुलिंग न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केल्याचं पाहायला मिळालं. आम्ही सभापतींना एक पत्र दिले होते. प्रस्तावाची सुचना दिली होती. कोणत्या अधिकारात point of information द्वारे विश्वास प्रस्ताव कसा आणला? तुम्ही करु शकता, कारण तुमच्याकडे मेजोरिटी आहे. पण आम्हांला बोलू तरी द्या असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. इतके वेळ विरोधक आंदोलन करत होते. पण तुम्ही एकदाही विचारलं नाही. तुम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून बसले का? असा सवाल अंबादास दानवे यांनी चित्रा वाघ यांना केला. निलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव 5 मार्चला दिला होता.  
काल हा प्रस्ताव नाकारला आहे. आज कुठेही सभागृहाच्या कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर विश्वास ठराव मांडला होता.  त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचा त्यांना माज आहे असे दानवे म्हणाले. रेटून त्यांनी गोऱ्हेंबद्दलचा विश्वास ठराव मंजूर करून घेतला. आम्हाला कुठली बोलण्याची संधी त्यांनी नसल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. 


आदित्य ठाकरेंचीही टीका


शिवसेना ठाकतरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली आहे. दोन्ही सभागृहात मनमानी कारभार सुरु असल्याचे आदित्य ठाकरे म्हणालेत. आम्ही प्रश्न विचारले तर मंत्रीच नसतात मग बोलून विषय मांडून फायदा तरी काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वरच्या सभागृहात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला तरी रेटून नेण्याचं काम हे सत्ताधारी लोकांककडून केलं जात असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे मणिपूर बनवण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या: 


भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही