73th Republic Day : देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही देशाची राजधानी दिल्लीतील राजपथ येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या शक्ती आणि संस्कृतीची भव्य परेड आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.


या परेडमध्ये अनेक गोष्टी घडत आहेत ज्याचा देश पहिल्यांदाच साक्षीदार होत आहे. परेडचे मुख्य आकर्षण म्हणजे 75 विमाने आणि हेलिकॉप्टरचा फ्लायपास्ट.


परेड बद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी



  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ट्विट करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या, "सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!", असे ट्विवट पंतप्रधानांनी केले.

  2. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या वर्षीचा उत्सव महत्त्वपूर्ण आहे, जो देशभरात 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा केला जात आहे.

  3. यंदाच्या समारंभात नॅशनल कॅडेट कॉर्प्सचा 'शहीदांना सलाम' हा कार्यक्रम सुरू होणार आहे. 

  4. देशभरातील नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेले सुमारे 480 नर्तक परेडमध्ये सादरीकरण करतील

  5. ज्या प्रौढांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना राजपथ येथील परेडमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे. कोरोना महामारीमुळे या वर्षी परेडमध्ये परदेशी तुकडी नाही.

  6. चांगल्या दृश्यमानतेसाठी, सकाळी 10.30 वाजता परेड नेहमीपेक्षा अर्धा तास उशिराने सुरू झाली. कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.

  7. 21 तोफांची सलामी देऊन तिरंगा फडकवल्यानंतर परेडला सुरुवात झाली. देशाचे सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांनी सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती यांना अभिवादन करणाऱ्या तुकड्यांचे नेतृत्व केले.

  8. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षक बाबू राम यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मरणोत्तर अशोक चक्र प्रदान केले. शहीद बाबू राम यांच्या पत्नीने त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

  9. लोकांना ऑनलाईन थेट कार्यक्रम पाहण्यासाठी MyGov पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगण्यात आले. या पोर्ठलवर लोकप्रिय सर्वोत्कृष्ट मार्चिंग आणि चित्ररथासाठी मतदान देखील करता येईल.

  10. 29 जानेवारी रोजी विजय चौकात होणाऱ्या 'बीटिंग रिट्रीट' सोहळ्यासाठी ड्रोन शोचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये देशी बनावटीचे 1000 ड्रोन असतील.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha