Jalna News : ब्रिटन आणि फ्रान्स या देशांपासून टास्क फोर्स (Task Force) आणि केंद्र शासनानं बोध घ्यावा आणि निर्बंध शिथील करण्याबाबत भूमिका घ्यावी, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच, ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढतोय, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. दरम्यान, जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


"ज्या अर्थी ब्रिटन आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांनी संसदेत भाषण करुन सांगितलं की, आता आपल्याला कोरोनासोबत राहायचं आहे. देशांनी कोरोना बरोबर रहाण्याची मानसिकता करून तेथील निर्बंध शिथील करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे या देशांपासून बोध टास्क फोर्स आणि केंद्र शासनानं घ्यावा", असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच केंद्राच्या भूमिकेची महाराष्ट्र सरकार वाट बघत असल्याच देखील टोपे टोपे यांनी म्हटलंय. तसेच, ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करत टोपे यांनी लस घेण्याची पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना विनंती केली आहे. 


तिसऱ्या लाटेत सध्या 90 ते 95 टक्के बेड्स रिकामे, राज्याच्या दृष्टीने आधार देणारी बाब : आरोग्यमंत्री (Rajesh Tope)


आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "राज्यात तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र राज्यात तिसऱ्या लाटेतसुद्धा सध्या दवाखान्यात 90 ते 95 टक्के बेड्स रिकामे आहेत. तसेच, दवाखान्यात भरती होण्याचं प्रमाण केवळ 5 ते 7 टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान ही बाब समाधानकारक आणि  राज्याला आधार देणारी असल्याचं देखील टोपे म्हणाले. 


दरम्यान, जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस कवायत ग्राउंडवर हा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी आरोग्यमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस दलात अतुलनीय कार्य करणाऱ्या पोलिसांचा गौरव करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा