वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेची दहा कोटींची रोकड एका शाखेतून दुसऱ्या शाखेत नेली जात होती. त्या रकमेचा पूर्ण हिशेब आहे, असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं. गुरुवारी रात्री मुंबईच्या टिळकनगरमध्ये 10 कोटी 10 लाखांची रक्कम जप्त केली गेली. बँक मॅनेजर आणि इतर दोन जण ही रक्कम कारमधून नेत होते. त्यावेळी ही कारवाई केली गेली.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि खासदार प्रीतम मुंडे या वैद्यनाथ को. ऑप. बँकेच्या संचालिका आहेत. या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. जप्त रोकड आणि बँकेचे तपशील तपासून पाहिले जाणार आहेत. या कामात मदतीसाठी रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.