मुंबई : रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. डॉ. संदीप भोसले यांच्याशी 27 वर्षीय ललिताचा साखरपुडा झाला.


भारतीय महसूल सेवेतील डॉ. संदीप भोसले आणि माणदेशी एक्स्प्रेस अशी ख्याती असलेली ललिता यांचा साखरपुडा नुकताच पुण्यात संपन्न झाला. ललिता आणि संदीप यांचं लग्न दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीनं ठरवलं आहे. दोघांनीही एकमेकांना पहिल्या भेटीतच पसंत केल्याची माहिती आहे.

सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये ललिताचा जन्म झाला. ललिता मुख्यत: तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत खेळते. या प्रकारात ती सध्याची भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहे.