Vadhavan Port Inaugurate News : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर (Vadhavan Port) प्रकल्पाचे भूमिपूजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास 50 हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा, म्हणून 5000 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या नावाखाली गर्दी वाढवण्यासाठी नेले जात असल्याचा आरोप युवा सेनेनं केला आहे. 


दरम्यान, वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रातील व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान  मोदी हे बरोबर एक वाजता पालघरमध्ये येऊन दीड वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. 


राजकीय कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना नेण्यावर युवा सेनेचा


राजकीय कार्यक्रमासाठी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नेण्यावर युवा सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. कुलगुरु आणि उत्सव तंत्र शिक्षण सचिव यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.  या कार्यक्रमासाठी  गर्दी वाढवण्यासाठी उरणच्या वीर वाजेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने शैक्षणिक सहलीच्या नावाखाली या कार्यक्रमाला नेले जात असल्याचा आरोप युवा सेनेने केलाय. या संदर्भात युवा सेना उच्चतंत्र शिक्षण सचिव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे या सगळ्यांबाबत तक्रार करणार आहे. राजकीय कार्यक्रमाला शैक्षणिक सहलीचे नावाखाली कॉलेजच्या परीक्षा सुरु असताना वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला नेण्याचा घाट का घातला जातोय? असा प्रश्न युवा सेनेकडून विचारला गेला आहे. 


वाढवण बंदर उभारल्यामुळं येथील लाखो नागरिकांना रोजगार मिळणार


वाढवण बंदर उभारल्यामुळं येथील लाखो नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचं बोललं जात आहे. वाढवण बंदराच्या उभारणीमुळं देशाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याचा जेएनपीएनं दावा केला आहे. वाढवण बंदर हे समुद्रात असल्याने कोणालाही विस्थापित केलं जाणार नसल्याची जेएनपीएनं ग्वाही दिली आहे. वाढवण बंदरामुळे शंखोदराला कुठलाही धोका नसल्याचाही दावा जेएनपीएनं केला आहे. वाढवण बंदरामुळे पालघरचा विकासात्मक कायापालट होणार असल्याचे मत जेएनपीएनं व्यक्त केलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


Vadhavan Port Palghar: वाढवण बंदरासाठी 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार; स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार