President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सहा डिसेंबरला रायगडला भेट देणार आहेत. यावेळी ते हेलिकॉप्टरने रायगडावर जाणार होते. मात्र, शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध दर्शवल्यामुळे राष्ट्रपतींनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रोपवेने रायगडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
सहा डिसेंबरला राष्ट्रपतींचा किल्ला रायगडावर दौरा आहे. राष्ट्रपतींचं हॅलिकॉप्टर रायगडावरील होळीच्या माळावर उतरवण्याला शिवप्रेमींनी विरोध दर्शवला होता. हॅलिकॉप्टर पाचाड इथं उतरवण्याची मागणी कोकणकडा मित्र मंडळाने केली होती. हेलिकॉप्टरमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर धुळ, माती, केर कचरा उडत असल्याने शिवप्रेमींनी हा विरोध दर्शवला होता.
खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचं वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राष्ट्रपती कार्यालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रपती सहा डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपतींची रायगड भेट ही गौरवास्पद बाब असल्याचं खासदार संभाजीराजेंनी नमूद केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत आता राष्ट्रपती रायगडाला भेट देणार आहेत.
President Security Plan : राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा प्लान कसा लीक झाला?, पोलीस चौकशीचे आदेश
संबंधित बातम्या :
- Raigad Viral Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींचा मोहक पुतळा....रायगडवरच्या मुसळधार पावसाचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल
- Viral Video : नवरा-नवरीचा स्वॅग भारी; JCBच्या बकेटमध्ये बसून मांडवात एन्ट्री, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं
- Viral Video : 'गार्लिक म्हणजे आलं', पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांची अजब 'माहिती'; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल