परभणी : मुंगुस आणि सापाचे नाते सर्वांनाच माहित आहे. मुंगसाला साप दिसला तर तो कसल्याही परिस्थित त्याला सोडत नाही. यावेळी साप आपले प्राण वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने धावतो. परभणीत अशीच एक घटना घडली आहे. मुंगुस मागे लागल्यानंतर धावताना नाग चक्क विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारांवरच चढला. रात्रभर तो तेथेच तारांवर राहिल्यानंतर सकाळी एका सर्पमित्राने स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचविले.  


त्याचे झाले असे की, परभणीच्या मानवत शहरातील खरबा भागात काल रात्री नागाच्या मागे मुंगुस लागला होता. मुंगसाने नागाला चांगलेच जखमी केले होते. त्यामुळे मुंगसाच्या तावडीतून वाचण्यासाठी पळालेला नाग चक्क विजांच्या तारांवरच चढला. मात्र तिथे त्याचा संघर्ष संपला नाही. तिथे तो रात्रभर तारांवरच अडकून पडला. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी परभणीतील सर्पमित्र गोपाल गिरी यांना याबाबतची माहिती समजली. गिरी यांनी वेळ न दवडता स्वत:चा जीव धोक्यात घालून दुसऱ्या खांबावर चढून या नागाचे प्राण वाचवले.   
मुंगसाने केलेली जखम त्यातच रात्रभर 20-30 फुटांवर राहिलेल्या नागोबांना खाली काढून गोपाळ गिरी यांनी योग्य ते उपचार करून निर्जन स्थळी सोडून दिले.


 दरम्यान गिरी यांनी केलेल्या या धाडसाचे सोशल मीडियावरून कोैतुक होत आहे. परंतु,धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा सर्पमित्र गोपाळ गिरी हे अडकलेल्या नागाला काढण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी तो नाग फणा काढून त्यांच्या अंगावर येत होता. तरीही गिरी यांनी त्याचा जीव वाचवलाच.  



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


इतर महत्वाच्या बातम्या 


अजब नंबरमुळे मुलीला घराबाहेर पडणे झाले होते कठीण, अखेर महिला आयोगाने पाठविली आरटीओला नोटीस 


Yahoo Search Engine : इंटरनेटच्या सर्चमध्येही मोदी अव्वल स्थानी, ममता बॅनर्जी, आर्यन खानचाही यादीत समावेश