मुंबई : कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापुरात विजेच्या कडकडासह पाऊस झाला, तर तिकडे सिंधुदुर्गतील कुडाळ तालुक्याला पावसाने झोडपलं.
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ-झारापदरम्यानची वाहतूक धीम्या गतीनं सुरु होती. काही ठिकाणी टेलिफोन सेवा ठप्प झाली. सिंधुदुर्गातील नांदगाव, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, वेगुर्ले, मालवण तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला.
वाशिम शहरात पावसानं हजेरी लावली. सकाळी शहराचा पारा 41 अंशांवर पोहचला होता. उन्हाच्या कडाक्यानं लोक हैराण झाले होते. अचनाक दुपारी आकाशात ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. फक्त 10 ते 15 मिनिटं बरसलेल्या पावसानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि वाशिमकरांची उन्हाच्या कडाक्यापासून सुटका झाली.