प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आजवर या देशात अनेक व्हायरस येऊन गेले. आपण त्यांना यशस्वीरित्या तोंड दिले आहे. कोरोना व्हायरसला सुद्धा आपण तोंड देऊ त्यासाठी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली पाहिजे, असं ते म्हणाले. ज्या पद्धतीने मीडिया आणि शासनाने कोरोना व्हायरस संदर्भात बातम्या दिल्या आहेत आणि ज्या पद्धतीने शासनाने कार्यक्रम आखला आहे, कदाचित तो खरा ही असेल. पण आता कुठेतरी लोकांची सुटका झाली पाहिजे. अशी आजची परिस्थिती आहे. मात्र याबाबत सरकार काही भूमिका घेईल असे आपल्याला वाटत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
सामान्य माणसाला माझे आवाहन आहे की त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली पाहिजे, शासनाची अपेक्षा धरू नका, आपले मित्र मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना भेटायला सुरुवात करा, आपल्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला जा, शासनाने आपल्या मनामध्ये जी भीती घातली आहे ती कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आपोआपच आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे ही वाचा