मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. असे असले तरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शहरातील हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट मंदावला आहे. मुंबईच्या 11 हॉटस्पॉटमध्ये क्षेत्रात 1500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. यात धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थ वॉर्ड मुंबईत कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक आहे. तर गेले काही दिवस प्रथम क्रमांकावर असलेला वरळीचा समावेश असलेला जी साऊथ वॉर्ड 7 व्या क्रमांकावर गेला आहे.


राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात रोज सलग दोन हजारच्या घरात नवीन रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबई शहरात आहेत. मात्र, हॉटस्पॉट मधील रुग्ण वाढीचा वेग मंदावल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा वेग आटोक्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी : सर्व्हे

मुंबई मधील हॉटस्पॉची परिस्थिती

  • मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला वांद्रे पूर्वचा एच इस्ट वॉर्ड पहिल्या पाच हॉटस्पॉटमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.

  • मुंबईतील सर्वच 24 वॉर्डमधील रुग्णसंख्या 300 च्या पुढे आहे.

  • मुंबईच्या 11 हॉटस्पॉर्टमध्ये 1500 पेक्षा अधिक रुग्ण आहेत.

  • जी नॉर्थ : दादर, माहिम, धारावी - 2728 रुग्ण; 617 रुग्ण बरे झाले. 3

  • ई वॉर्ड : भायखळा, भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग - 2438 रुग्ण; 803 रुग्ण बरे झाले.

  • पि नॉर्थ : मालाड, मालवणी, दिंडोशी परिसराचा समावेश - 2377 रुग्ण; 677 बरे झाले.

  • एल वॉर्ड : कुर्ला परिसराचा समावेश - 2321 रुग्ण; 510 रुग्ण बरे झाले.

  • एच इस्ट : वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ. (मातोश्री) - 2094 रुग्ण; 615 रुग्ण बरे झाले.

  • के वेस्ट : अंधेरी पश्चिमचा भाग - 2049 रुग्ण, 674 बरे झाले

  • जी साऊथ : वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 1905 रुग्ण; 833 रुग्ण बरे झाले.

  • के ईस्ट : अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - 1875 रुग्ण; 583 बरे झाले.

  • एम ईस्ट : गोवंडी, मानखुर्दचा समावेश - 1696 रुग्ण; 435 रुग्ण बरे झाले.

  • एफ साऊथ : परळ, शिवडीचा समावेश - 1648 रुग्ण; 396 बरे झाले

  • एन : घाटकोपरचा समावेश - 1525 रुग्ण; 300 बरे झाले.


मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्यावाढीचा दर मंदावला. मात्र, अजुनही चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 8% पेक्षा जास्त आहे. वरळी, धारावीत रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. वरळीचा समावेश असलेल्या जी साऊथमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 3.1% आहे. तर धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 3.6% आहे. वडाळा, सायन विभागाचा समावेश असलेल्या एफ नॉर्थ मध्येही 3.6% इतका आहे.

रुग्णसंख्या वाढीचा दर कुठे जास्त

  • एन वॉर्ड : घाटकोपरचा समावेश- 9.6%

  • पी नॉर्थ : मालाडचा समावेश - 8.5%

  • एस वॉर्ड : भांडुप, विक्रोळीचा समावेश - 8.3%

  • आर सेंट्रल - बोरिवलीचा समावेश- 8.2%


Covid Hopsital | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात 300 खाटांचं हॉस्पिटल