अकोला : लॉकडाऊन सरकारने खुशाल लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू, असं  वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सरकार सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवू शकणार नसेल तर लॉकडाऊन मोडावं लागेल. अशा रीतीने प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे.


कोरोनासंदर्भातील आकडे साशंकता निर्माण करणारे, मृत्यूदर, रिकव्हरी रेट यांचे आकडे फसवे आहेत. हे गणित सरकारनं समजून सांगावं. यातून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची कोरोना चाचणी करण्याचा वटहुकूम मुख्यमंत्र्यांनी काढावा. आपण स्वत: कोरोना टेस्ट केली, ती निहेटीव्ह आलीय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.


भविष्यात शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात सध्या काही शक्यता नाही. ठाकरे कुटुंबियांशी जवळीक बाळासाहेबांपासून आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही. मात्र शिवसेना सध्या राष्ट्रवादीसोबत असल्यानं त्यांच्यासोबत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.


"मुख्यमंत्री साहेब!, खुदा होऊ नका, लोक उपासमारीने मरतील" : प्रकाश आंबेडकर


दरम्यान कालही प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या केलेल्या दाव्यावर तिरकस टीका केली होती. असे दावे करून स्वत: 'खुदा' (देव) बनू नका, असं प्रकाश आंबेडकरांनी सुनावलं होतं. कोरोनाची भीती न बाळगण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला होता. यासाठी त्यांनी यासंदर्भात भारतातील कोरोनासंदर्भात ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा दाखला दिला होता. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील, अशी भीती आंबेडकरांनी काल व्यक्त केली होती.


Prakash Ambedkar "मुख्यमंत्री साहेब,खुदा होऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर प्रकाश आंबेडकरांची तिरकस टीका