मुंबई इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi)  सहभागी होण्यावरून सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचे हे आत्ता त्यांनी ठरवायचं आहे. पण आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दार बंद आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिलीये. आता आम्ही एकत्र येणारच आहोत, शरद पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.  


प्रकाश आंबेडकर म्हणाले,   आता आम्ही एकत्र येणारच आहोत त्यामुळे  भेटी होणार आहेत.  एखाद्या भेटीविषयी स्पेक्युलेशन करायला नको. आम्ही एकत्र येणार आहोत. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यामुळे शरद पवार यांचीही भेट होत राहणार आहे. इंडिया आघाडीमध्ये आमचा समावेश कधी होणार आहे हे त्यांनीच ठरवायचे आहे तेच  ठरवणार आहे. 


संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज : सुप्रिया सुळे


प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं समाजकारणातलं मोठं नाव आहे. आम्हाला विश्वास आहे की प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत एक मोठा रोल करतील. संविधानाच्या सुरक्षेसाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील.,गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबीयांनी मोठं योगदान दिलंय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही चांगल्या पद्धतीने काम केलंय. संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या


वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय : संजय राऊत


 प्रकाश आंबेडकर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगला समन्वय आहे, प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे. आंबेडकर आणि शरद पवार यांचा ही संवाद आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडी हा पुढला विषय आहे आम्ही महाराष्ट्राचा विचार करत आहोत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. ही शरद पवारांची,  उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भूमिका आहे.  त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे, असे राऊत म्हणाले.


हे ही वाचा :