मुंबई | भाजप सरकारने देशावर 1990 सालासारखं आर्थिक संकट आणलं आहे, असा दावा करत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकास्र सोडलं.
बेरोजगारी, रुपयाचं अवमूल्यन आणि आर्थिक असमानता याबाबत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाला जबाबदार धरलं. दरम्यान, वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे का, या आरोपांवर मात्र त्यांनी न बोलणंच पसंत केलं.
देशातील एकूण संपत्तीच्या 50 टक्केपेक्षा जास्त संपत्ती ही जवळपास 3 लाख कुटुंबांकडे आहे. रुपया घसरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपकडून उद्योगपतींचा छळ होत आहे. काही जणांची माहिती इतरांना दिली जाते, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेली कुटुंबं स्थलांतर करत आहेत, आपली संपत्ती विकत आहेत. रुपये डॉलरमध्ये बदलून भारतातून पलायन करतोय. आयातही होत नाही आणि निर्यातही अशी सध्याची परिस्थिती आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
एइडीआयमध्ये येणारा पैसाही बंद झाला आहे. देशातील 50 हजार कोटी रुपये डॉलरमध्ये रुपांतरित केले जाऊ शकतात. तसं झालं तर डॉलरची किंमत 100 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसंच या सगळ्याला भाजप सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महाआघाडी
आम्ही वेगळी आघाडी केलेली नाही, काँग्रेसला मी कधीपासून आघाडीसाठी विचारतोय पण तेच चर्चेला येत नाहीत असं प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीबाबत बोलताना स्पष्ट केलं.
पवारांसोबत आघाडीचा निर्णय काँग्रेसने घ्यावा
राफेलबाबत राहुल गांधी यांनी चोरी झाली असं म्हटलं होतं. शरद पवारांनी राहुल गांधींना खोटं ठरवलं.
आता काँग्रेसने ठरवावं, पवारांबरोबर आघाडी करायची की नाही अशा शब्दात पवारांवरही निशाणा साधला. तसंच काँग्रेसच्या जागी मी असतो तर अशा स्थितीत आघाडी केली नसती असंही स्पष्ट केलंय.
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयामध्ये मोठी घसरण | प्रकाश आंबेडकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2018 08:59 PM (IST)
भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकास्र सोडलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -