Chhatrapati Sambhjinagar: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) हे आज मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करत त्यांनी सांगितले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात या घोषणामुळे मोठी उलथापालट होणार का ? प्रश्नांना यामुळे उधाण आले आहे.
विधानसभेची तयारी की राजकीय उलथापालथ?
विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील पक्षांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. कुठे कोणता उमेदवार द्यायचा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मी आज मोठी घोषणा करणार असल्याचे ट्विट केले आहे.
पत्रकार परिषदेबाबत केले ट्विट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली जाणार आहे का? नक्की या घोषणेचा उद्देश काय असणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. यासाठी शहरातील सुभेदारी विश्रामगृहात ऍड प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार असून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एक व्हिडिओ ही X समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आला आहे.

I will be making a BIG announcement today.

Press Conference at Subedari Government Guest House in Aurangabad.

See you at 4 PM. https://t.co/a9I8zXYPnH
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 16, 2024

विशाळगडप्रकरणी ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले..
विशालगडावर (Vishalgad) आधीपासून लोक होते त्यांनी अतिक्रमण केलं आहे, पण अतिक्रमण काढण्याचे पण नियम आहेत. तुम्हाला ते लगेच काढता येत नाही, तसा प्रस्ताव दिल्यास ते शक्य आहे. संभाजीराजे (Sambhaji raje) आंदोलन करत असताना जो काही प्रकार घडला आहे, आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे जे सैन्य आहे, धारकरी आहेत त्या धारकांनी तिथे धुडगूस घातला, अशी आमची माहिती आहे. जाणून-बुजून तेथील लोकांना मारझोड करण्यात आली आणि दुकान तोडण्यात आली. एक तंग वातावरण तिथे तयार करण्यात आलं. सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण? होते याचा शोध घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.
अससुद्दीन ओवेसेंनीही घेतला विधानसभेचा आढावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवेसी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून १३ जुलै रोजी आढावा बैठक घेतली होती. कुठे निवडणूक लढवू शकतो ? कुठे कोणता उमेदवार देता येईल ? याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: