Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) अनुपम्य सोहळ्यासाठी लाखो भाविकांच महासागर चंद्रभागा तीरी जमली आहे. चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेच्या पवित्र स्नानसाठी भाविकांचा महासागर लोटला आहे (Pandharpur Ashadhi Wari 2024) . हाथरस दुर्घटनेनंतर प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले असून चंद्रभागेच्या अरुंद घाटावरून टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडण्यात येत आहे. चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त सुरू आहे. 


आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अशातच आज दशमीला 10 ते 12 लाख भाविकांची मांदियाळी जमलेली दिसून येतेय. पंढरपूरच्या नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्गावर लाखोंच्या संख्येने भाविक उतरल्याने ओव्हर पॅक झाले आहे. शेकडो दिंड्या रस्त्यावर उतरल्याने हरिनामाच्या गजरात पंढरी नागरी दुमदुमून गेली आहे. पंढरपुरात भक्तीचा आणि भक्तांचा महापूर आलेला आहे. त्यामुळे सारी पंढरी अवघ्या महाराष्ट्राला आषाढीच्या सोहळ्यात विठ्ठलमय करण्यास सज्ज झालेली दिसते.


भक्तांमध्ये भेद नाही! आषाढीला व्हीआयपी दर्शन बंदच-


मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी (Pandharpur Ashadhi Wari 2024) टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले . वास्तविक मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापुजेला मर्यादित व्हीआयपींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी Abp माझाशी बोलताना सांगितले . याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 


भाविकांना 15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार-


आषाढी यात्राकाळात दर्शन रांगेत हजारो भाविक असताना बंद केलेले व्हीआयपी दर्शन हे बंदच राहणार असून सर्वसामान्य भाविकांना झटपट दर्शन मिळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची खंबीर भूमिका सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माझाशी बोलताना व्यक्त केली. Abp माझाने याबाबत वृत्त दाखविल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत सर्वच बड्या व्हीआयपी व्यक्तींनाही झटपट दर्शन देण्यास मनाई केल्याने बाकीचे घुसखोरी करणारे तथाकथित व्हीआयपी यांची घुसखोरी बंद झाली. यामुळेच 15 तास रांगेत उभं राहणारे  भाविक केवळ 4 ते 5 तासात आता देवाच्या  पायापर्यंत पोहचत आहेत. याच पद्धतीने भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. दर्शन रांगेतील भाविकांना 15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . 


संबंधित बातमी:


Varkari Pesion Scheme : मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, कोणाला मिळणार लाभ? काय असतील तरतूदी?