Shiv Shakti and Bhim Shakti : प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे ( Prakash Ambedkar and Uddhav Thackeray ) यांच्या संभाव्य राजकीय युतीसंदर्भात दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. दोन्ही पक्ष आपल्या पक्षपातळीवर याची चाचपणी करत आहेत. यातच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येत्या 20 नोव्हेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील एका कार्यक्रमानिमित्तानं मुंबईत एकत्र येणार आहेत. येथून ही चर्चा पुढे सरकण्याची चिन्ह आहेत. मात्र, आंबेडकरांनी सध्या यावर चुप्पी साधणं पसंद केलं आहे.

  
 
1995 साली राज्यात जेव्हा महायूतीचं सरकार आलं. तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वातच शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्या होत्या. शिवसेना, भाजप आणि रिपाईंची यूती झाली होती. पुढे 25 वर्ष ही यूती होती. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा आली. आणि 2017 साली पहिल्यांदा महायूती तुटली. महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला. त्यावेळी मात्र, रामदास आठवलेंनी शिवसेनेऐवजी भाजपसोबत राहणं पसंत केलं..


2019 साली दोन्ही पक्ष एकत्र आले. पण, निवडणुकांच्या निकालानंतर चित्र बदललं. भाजप-शिवसेना पुन्हा वेगळे झाले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले. आणि दोन महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी सेनेत बंडखोरी केली. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.  उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेला पुन्हा उभं करण्याचं आव्हान उभं राहिलं.


गेल्या दोन महिन्यात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठकांचा धडाकाच लावला. त्याच काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवे मित्रही मिळाले. आणि त्यातच आता आणखी नवा मित्र मिळण्याची शक्यता आहे. जर ती मैत्री झाली तर राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊ शकतात. खरंतर, प्रकाश आंबेडकरांनी याआधीही या यूतीवर भाष्य केलं होतं. आता दोन्ही नेत्यांमध्ये भेट होण्याचीही शक्यता आहे. आणि त्यात यूतीसंदर्भातही चर्चा होवू शकते. पण, मग प्रश्न असा आहे की. जर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले. तर राष्ट्रवादीचा विरोध होण्याची शक्यता आहे. शिवाय, काँग्रेसचीही नाराजी होऊ शकते. कारण, प्रकाश आंबेडकरांनी अनेकवेळा काँग्रेस-राष्ट्रावादीसमोर यूतीचा प्रस्ताव दिला होता. पण, त्यांच्यात काही जमलं नाही. अशातच जर शिवसेनेनं वंचितला सोबत घेतलं  तर मविआचं काय होणार? याची चर्चा होईल हे नक्की.