सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असा आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. भाजप कुठेही जरांगेंच्या भूमिकेला विरोध करत नसून जरांगे (Manoj Jarange) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेलं भांडण नकली असल्याचा दावाही त्यांनी केला. पंढरपुरात झालेल्या आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं.
भाजप कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीत
राजकारण समजून घ्या, जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस याचे भांडण नकली आहे असं सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपाने ओबीसी विरोधात भूमिका घेतली आणि जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला तरच हे भांडण खरं आहे हे समजून घेऊ. अन्यथा हे नकली भांडण असेल.
भाजपने जरांगे पाटील यांच्या मागणीला कधीच विरोध केला नाही असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. ते म्हणाले की, स्वतःला फसवून घेऊ नका. यांचे दाखवायचे आणि खायचे दात एक असेल तर मत मागायला या असे आता भाजपला लोकांनी सांगितले पाहिजे.
शरद पवारांनी पळवाट शोधू नये
ओबीसी-मराठा आरक्षण वादावर शरद पवारांची पळवाट शोधू नये असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते म्हणाले की, शरद पवार हे एका पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिले असताना समाजहिताचे काम करताना धाडस दाखवा. शरद पवारांची ही पळवाट आहे. ते गेले अनेक वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेले मराठा नेते आहेत. त्यांनी तर हा प्रश्न मागेच सोडवायला पाहिजे होता. परंतु ते आता या प्रश्नावरून पळवाट काढत आहेत.
मराठा आणि ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांना एकत्र बसवून प्रश्न सोडवावा असे आवाहन शरद पवार यांनी केले. शरद पवारांनी केलेल्या या आवाहनावर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली.
ही बातमी वाचा :