Prajakt Tanpure was questioned by the ED: महाविकास आघाडीतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची इडीकडून तब्बल सात तास चौकशी झाली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरणात ही चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे, त्यामुळे ही चौकशी ईडीकडून करण्यात आली आहे. प्राजक्त तनपुरे यांना ईडीने समन्स बजावला होता. मंगळवारी तनपुरे यांना दुपारी एक वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं. पण ईडीच्या मीटिंगमुळे दुपारी तीन वाजता चौकशी सुरू झाली.  राज्य सहकारी बँक संदर्भात चौकशी झाली. तनपुरे यांनी ईडीला समाधानकारक उत्तरं दिल्याचं समजतेय. 


ईडीकडून चौकशी झाल्यानंतर बोलताना तनपुरे म्हणाले की, ईडीला सर्व उत्तर दिली आहेत. अजिबात काही गडबड नाही, मी समाधानकारक उत्तर दिली आहेत. प्रमुख प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, तांत्रिक बाबी शिल्लक आहेत त्याबाबत परत बोलावल्यास पुन्हा चौकशीसाठी हजर होणार आहे. जी आकडेवारी लक्षात नाही त्याबाबतच्या तांत्रिक बाबी आहेत. पुन्हा चौकशीसाठी बोलवल्यास हजर राहणार आहे. 


राज्य सरकारमधील 12 पेक्षा जास्त मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांमागे सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू आहे. त्यात आता प्राजक्त तनपुरेंचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



संबधित बातम्या 


ईडी म्हणजे पान तंबाखूचं दुकान झालंय, माझ्या घरी देखील धाड पडू शकते; प्रणिती शिंदेचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस ईडी कार्यालयात धडकणार; 'त्या' कारवाईबद्दल विचारणार जाब! 
Nawab Maliki on ED : कोणत्याही कारवाईला घाबरणार नाही, ईडी कारवाईनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया