Maharashtra Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम संपला आहे. आता पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. तसेच भाजपसह काँग्रेसच्या मित्रपक्षांनी देखील विधानसभेच्या तयारीला सुरुवात केलीय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील घटक पक्ष टेन्शन वाढवणार असल्याची शक्यता आहे. कारण महायुतीतील पीपल्स रिपब्लिकन पक्षाने (Peoples Republican Party) राज्यात विधानसभेला 30 जागांची मागणी केलीय. तसेच कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि महामंडळ प्रत्येकी एक देण्याची मागणी केली आहे.


 विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत जागावाटपावरुन ठिणगी


सरकार स्थापन झाल्यापासून सन्मानाचे स्थान पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळाले नसल्याची खंत देखील पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी महायुतीत असलेल्या बच्चू कडूंनी देखील स्वतंत्र विधानसभा लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच सदाभाऊ खोत यांनी देखील काहीच पदरी पडत नसल्यामुळं नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता पीपल्स रिपब्लिकन पक्षाने देखील आपल्या या मागण्या मांडल्या आहेत. अन्यथा चर्चा करुन वेगळी भूमिका घेण्याच्या तयारी करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत जागावाटप आणि मंत्रीमंडळ विस्तारावरून ठिणगी पेटायला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका


लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला आहे. महायुतीला 48 पैकी  फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या असून, अपक्षाला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुतीला योग्य नियोजन करावं लागेल. जागावाटप करताना काळजी घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडुकीत महायुती 45 प्लस जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. जनतेनं महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचं दान टाकलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Dattatray Bharane : महायुती एकत्र लढणार की नाही चर्चा रंगली असतानाच आमदार दत्तात्रय भरणेंकडून सूचक भाष्य