पुणे : खासगी गाडीवर लाल दिवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवर कब्जा...जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. त्यांच्या या कारनाम्यांची चर्चा पुण्यातील गल्ल्यांपासून दिल्लीपर्यंत होत आहे. अखेर चर्चानंतर पूजा खेडकर प्रकरणी काल एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. जर या समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळून आल्या तर पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे.
डॉ. पूजा खेडकर या 2023 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. अजून त्यांच्या कारकीर्दीला नीट सुरुवातही झाली नाही पण अवघ्या काही महिन्यांतच त्या चर्चेचा विषय बनल्या. प्रोबेशनवर रुजू होण्याआधीच पूजा खेडकरांच्या डोक्यात पदाची हवा गेली होती. रुजू होण्यापूर्वीच स्वतंत्र केबिन, कार, शिपाई आणि निवासस्थानाची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसण्याची सूचना फेटाळली. अप्प्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनचा जबरदस्तीनं ताबा मिळवला. स्वतःच्या खासगी ऑडी कारवर सरकारी वाहनांवरचा लाल दिवा लावत होत्या. प्रोबेशनवर असलेल्या अधिकाऱ्याला हे सगळं मिळणं नियमबाह्य असतानाही त्यांनी वडिलांच्या मदतीनं ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.
पूजा खेडकरांवर फौजदारी कारवाई होणार
पुण्यात प्रोबेशनवर असताना केलेल्या प्रतापानंतर पूजा खेडकर प्रकरणी काल एस सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थापन करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळून आल्यास पूजा खेडकर यांना आयएएस पदावर रुजू होऊ दिले जाणार नाही. तसेच खेडकर यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग करणार कारवाई आहे.
खोट्या सर्टिफिकेटवर पूजा खेडकर आयएएस
2019 ला सर्वसाधारण उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या पूजा खेडेकर यु पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण तर झाल्या मात्र त्यांना कमी मार्क्स असल्यामुळं आय ए एस चा दर्जा मिळू शकला नाही . मग 2022 ला पूजा यांनी त्यासाठी शक्कल लढवायचं ठरवलं . आपण फिजिकली डिसेबल म्हणजे शारीरिक दृष्ट्या अपंग आहोत असा दावा करत तस सर्टिफिकेट त्यांनी यु पी एस सी ला सादर केलं . द पर्सन विथ बेंच मार्क डिसेंबलीटीज हा एक वेगळी क्याट्यागरी यु पी एस सी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी उपलब्ध आहे . ज्यामध्ये शारीरिक अपंगत्व किती प्रमाणात आहे यावरून 1, 2, 3, 4 आणि पाच असे प्रकार ठरवण्यात आलेत . पूजा खेडकर यांनी यातील सर्वात खालची म्हणजे टाईप पाचची डिसेबलीटी त्यांना असल्याचा दावा केला . त्यासाठी त्यांना दृष्टिदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं . यामुळं यु पी एस सी परीक्षेत 821 क्रमांकाची रँक मिळूनही त्यांना आय ए एस चा दर्जा मिळाला . त्यावर्षी यु पी एस सी च्या यादीत ओ बी सी क्याटेगिरीतून आय ए एस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची 434 रँक होती . म्हणजे जवळपास दुपटीने मागे असूनही पूजा खेडकर आय ए एस बनण्यात यशस्वी झाल्या.
Video : Manorama Khedkar यांनी धमक्या दिल्या? मुळशीतील शेतकरी Exclusive
हे ही वाचा :