औरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला. या दौऱ्यात विविध ठिकाणच्या मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाच्या त्यांच्या मागण्या जाणून घेणं हा मुख्य हेतू त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. आपण पदाचा राजीनामा देण्याने समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर तसंही करण्यास सज्ज असल्याची तयारी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.
सध्याच्या घडीला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं यासाठी संभाजीराजे आग्रही दिसले. यावेळी राज्य शासनाने मराठा समाजाला न्याय द्यावा असं म्हणताना मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपनं दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देणं मात्र त्यांनी टाळलं.
Maratha Reservation : केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारु नये : अशोक चव्हाण
समाज हा समाज आहे, त्याला राजकीय वळण देऊ नका. किंबहुना आताची वेळच अशी आहे की राज्यकर्त्यांनी भूमिका मांडणं अतीशय गरजेचं आहे. मराठा समाजासाठी तुम्ही काय करणार ते स्पष्ट करणं गरजेचं आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. सध्याच्या घडीला हा विषय न्यायप्रविष्ट असला तरीही कोविड काळ निवळेल त्या वेळी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावच लागेल, 30 टक्के गरीब मराठा समाजासा आरक्षण मिळालंच पाहिजे अशा शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याचा हेतू अधोरेखित करत आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.
मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष मोर्चा 5 जूनला शंभर टक्के निघणार, विनायक मेटेंचा सरकारला इशारा
जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठीच हा दौरा....
'मी लोकांच्या भावना समजण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे, कोणत्याही पक्षाचा याच्याशी संबंध नाही. या दौऱ्यात मुख्यमंत्री, शरद पवार, विरोधी पक्ष नेत्यांना भेटणार आणि मराठा समाजाला काय देता येईल या बाबत चर्चा करणार', असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.