Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 मे 2021 बुधवार | ABP Majha


1. राज्यात मंगळवारी 24,136 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 36,176 रुग्ण कोरोनामुक्त


2. ओडिशामध्ये चक्रीवादळ 'यास' अतीतीव्र, सोसाट्याचे वारे, मुसळधार पावसाला सुरुवात, संध्याकाळपर्यंत ओडिशाच्या किनारी धकडणार


3. पोलिसांच्या बदल्यांवरुन मतभेदानंतर केंद्रात प्रतिनियुक्ती घेणारे सुबोध जयस्वाल सीबीआय प्रमुखपदी, 2 वर्षांसाठी नियुक्ती


4. 50 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच निर्बंध शिथिल करणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांची माहिती, लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्याचे संकेत


5. नवीन नियमांच्या अंमलबजावणीसाठी दिलेली डेडलाईन संपली, फेसबुक, ट्विटरवर कारवाई होणार की मुदतवाढ मिळणार याकडे लक्ष


 



6. बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी पावणे दहा वाजता साधणार संवाद, जगभरातले प्रमुख भिक्खु सहभागी होणार


7. नवी मुंबईतील मरिना जल वाहतुकीचा मार्ग मोकळा, सीबीडी येथे उभा राहणार बोटींचा मरिना सेंटर, केंद्रीय पर्यावरण विभागाचा ग्रीन सिग्नल


8. गुजरातहून कोलंबोला पोहोचलेल्या जहाजाला भीषण आग, आग विझवण्यासाठी तटरक्षक दलाच्या 2 जहाजांसह विमान दाखल, मोठं आर्थिक नुकसान


9. नाशिकमधील खासगी रुग्णालयात बिलावरुन वाद, फेसबुक लाईव्ह करत 'आप'च्या जितेंद्र भावे यांचं अर्धनग्न आंदोलन


10. चैत्यभूमीवरील प्रस्तावित सेल्फी पॉईंटला आरपीआयचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा, मुंबई महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष