जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. शिवसेनेतर्फे ज्या उमेदवाराला बी फॉर्म देण्यात आला होता, त्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केला, त्यामुळे सेना कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
याच गोंधळाला आवरण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत एकटे मैदानात उतरले आणि त्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण एकाचवेळी कार्यकर्त्यांचा उन्मत्त जमाव त्यांच्यावर धावून आला आणि खोत यांना मारहाण केली.
बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवलं आणि खोत यांची सुटका केली. ज्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिस अधिकाऱ्यावर हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पाहा व्हिडिओ :