हेडलाईन्स:

1. राणेंच्या इतिहासाची उजळणी करत मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना खडे बोल, गुंडगिरी वाढल्याचा आरोप फेटाळला, कोपर्डीवर कडक कारवाईचं आश्वासन

--------------------------

2. जयदेव ठाकरे यांचे कोर्टात उद्धव आणि ठाकरे कुटुंबावर बेफाम आरोप, आज इन कॅमेरा सुनावणी, वैयक्तिक आरोपांमुळं खळबळ

--------------------------

3. सरकारची तूरडाळ 120 रुपयावर तर बिग बझारची 99 रुपयात, ग्राहकांच्या उड्या, रेशनवर डाळ स्वस्त करण्याची मागणी

--------------------------

4. तुकाराम मुंढेंच्या कारवाईची उच्चस्तरीय चौकशी होणार, विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या वतीनं गिरीश बापटांची घोषणा

--------------------------

5. नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना कार्यकर्त्यांची मारहाण

--------------------------

6. भाजप नेत्याकडून मायावतींची तुलना वारांगणेशी, भाजप नेते दयाशंकर सिंहांची मुक्ताफळं, भाजपकडून सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी

--------------------------

7. लोकसभेत दलित अत्याचाराची चर्चा सुरु असताना राहुल गांधींना डुलकी, दृश्यं व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न

--------------------------

8. पंधरा दिवसांच्या तणावानंतर काश्मिरात शांतता, आजपासून शहारातील शाळा आजपासून सुरु होणार

--------------------------

9. दीपिका पदुकोणच्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटाचं पहिलं ट्रेलर लॉन्च, ट्रिपल एक्स चित्रपटात भागात दीपिका प्रमुख भुमिकेत

--------------------------

10. अँटिगात आजपासून विंडीजविरुद्ध लढाईचा पहिला कसोटी सामना टीम इंडियासह प्रशिक्षक अनिल कुंबळेचीही परीक्षा