PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदींचा देहू दौरा, मोदींची भाषणाला मराठीतून सुरुवात
PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहूतील शिळा मंदिराचं लोकार्पण, आज मुंबईतल्या कार्यक्रमात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर
PM Narendra Modi : राजभवन येथे क्रांतिकारी गॅलरीचा उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक मान्यवर एकाच मंचावर उपस्थित आहेत. या दरम्यान भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोठी यांनी मराठीतू भाषणाला सुरुवात केली आहे.
Uddhav Thackeray : राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचा उद्घाटन सोहळा आज राजभवन येथे सुरु आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भाषणात असे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण होणं हा चांगला मुहूर्त आहे.
PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणं आणि तुळशीचा हार देऊन वारकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभा मंडपात आगमन झालं आहे. काही क्षणात पंतप्रधान मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण झालं असून ते सभा मंडपात पोहोचले आहे. थोड्याच वेळात ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल झाले त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे खासदार गिरीश बापट स्वागतासाठी उपस्थित आहेत. यानंतर हेलिकॉप्टरमधून देहूकडे रवाना झाले.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वागतासाठी उपस्थित आहेत. यानंतर हेलिकॉप्टरमधून देहूकडे रवाना होणार आहेत.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. आमदार महेश लांडगे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील सभेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन देहू संस्थानकडून करण्यात आलं असलं तरी या कार्यक्रमावर भाजपची छाप दिसत आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार आणि शिवसेनेचे स्थानिक खासदारांचे नावही प्रोटोकॉलमध्ये नाही. याबाबत भाजपच्या आमदारांना विचारले असता हा अध्यात्मिक कार्यक्रम असल्याचं या आमदारांनी म्हटलं आहे.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल बसची सोय करण्यात आली आहे. पंधरा बस अंतर्गत आणि सात बाह्य भागात या बसे भाविकांना आज सेवा देत आहेत. या एसी बसमधून अवघ्या दहा रुपयांत हा प्रवास होणार आहे.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूमध्ये वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. मोदींची सभा ज्या ठिकाणी दुपारी दोन वाजता होणार आहे त्या ठिकाणी आतापासूनच वारकरी येण्यास सुरुवात झाली आहे.
PM Modi Maharashtra Visit : देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या व्यक्तींना नेहमीप्रमाणे काळ्या रंगाचे शर्ट, बनियन, टोप्या, मोजे घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. जे लोक काळे कपडे घालून येत आहेत त्यांना कपडे बदलण्यस सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अशाच एका फॅनला पोलिसांनी काळा शर्ट घालून आल्याबद्दल शर्ट बदलण्यास सांगितलं. मोदींच्या या फॅनची याबाबत कोणतीही तक्रार नाही.
Tukaram Maharaj Shila Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) हे आज (14 जून) देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहूत तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मात्र, हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर जाणून घेऊयात या शिळा मंदिराबद्दलची माहिती...
PM Modi Tweet : संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूतील संत तुकाराम मंदिराच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केलं. ते म्हणाले, "मी उद्या पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनीना भेटणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्याक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं."
"मुंबईमधील राजभवनमध्ये क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन असलेल्या गॅलरीचे उद्धाटन करणार आहे. 2016 साली राजभवनमध्ये एख भुयार सापडलं होतं. ब्रिटिशांच्या काळात या भुयाराचा वापर शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी केला जायचा."
"तसेच या दौऱ्यादरम्यान मी मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. पत्रकारितेमधील असा दीर्घ टप्पा पार केल्याबद्दल मुंबई समाचारची टीम आणि त्यांच्या वाचकांचे मी अभिनंदन करतो."
PM Modi to visit Maharashtra : आज पंतप्रधानांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत 22 एकरच्या मैदानात सभा होईल. यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.
PM Modi to visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांच्या हस्ते ठिकठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की, नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.
PM Modi to visit Maharashtra : देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येणार असून त्यांच्या स्वागताची देहूत जय्यत तयारी सुरु आहे. आज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचं देहूत आगमन होणार आहे. सुरुवातीला पंतप्रधान देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत.
पार्श्वभूमी
PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येणार असून त्यांच्या स्वागताची देहूत जय्यत तयारी सुरु आहे. आज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचं देहूत आगमन होणार आहे. सुरुवातीला पंतप्रधान देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांच्या हस्ते ठिकठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.
मुंबईत मोदी-ठाकरे येणार एकाच मंचावर
आज पंतप्रधानांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत 22 एकरच्या मैदानात सभा होईल. यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट
संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूतील संत तुकाराम मंदिराच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केलं. ते म्हणाले, "मी उद्या पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनीना भेटणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्याक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं."
"मुंबईमधील राजभवनमध्ये क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन असलेल्या गॅलरीचे उद्धाटन करणार आहे. 2016 साली राजभवनमध्ये एख भुयार सापडलं होतं. ब्रिटिशांच्या काळात या भुयाराचा वापर शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी केला जायचा."
"तसेच या दौऱ्यादरम्यान मी मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. पत्रकारितेमधील असा दीर्घ टप्पा पार केल्याबद्दल मुंबई समाचारची टीम आणि त्यांच्या वाचकांचे मी अभिनंदन करतो."
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -