PM Modi Pune Tour Live : आज पंतप्रधान मोदी पुण्यात; मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन, पाहा प्रत्येक अपडेट
Pune PM Narendra Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत.
रविवारची सुट्टी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याचं कसं काय दाखवलं. असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. त्यासोबत पंतप्रधानांना काळ्या रंगाचं इतकं वावडं का आहे. असा सवाल ही राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सिंहासनाधीश पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. मेघडबरी मधील साडेनऊ फूट उंचीचा ब्राँझ धातुमध्ये 2 टन वजनाचा पुतळा उभारण्यात आलाय. विवेक खटावकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी 6 महिन्यात पुतळा उभारला आहे, जमिनी पासून 22 फूट उंचीची मेघडंबरी आहे. यात साडे दहा फूट उंचीच्या सिंहासनावर बसलेली साडे नऊ फूट उंचीचा पुतळा आहे, सिंहासनाच्या दोन्ही बाजूला मांगल्याचे प्रतीक असलेलं हत्ती , मोर आहेत, सिंहासनाच्या वरच्या बाजूला लक्ष्मीचे प्रतीक असणारे कमळाचे फुल आहे, सिंहासनाच्या पुढच्या बाजूस शौर्याचे प्रतीक असणारे सिंह आहेत,, महाराजांच्या चेहऱ्यावर करारीपणा आहे हातात धोप, तलवार आहे तर पायात पायतान नाहीत, रायगड, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभ्यास करून हा पुतळा उभारण्यात आलाय
अजित पवार म्हणाले, मला पंतप्रधान नरेंद्र मोंदीना एक लक्ष आणून द्यायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहायायाने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे.
नागपूर मेट्रोप्रमाणं इतर शहरातील मेट्रोही वेगानं सुरु करा, मेट्रोच्या कामात राजकारण नको- अजित पवार
महत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा टोला
पंतप्रधानांनी मेट्रोचं तिकीट काढून प्रवास केला, आम्ही विनातिकीट! आमच्याकडूनही पैसे वसूल करा : देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदी गरवारे मेट्रो स्टेशनला पोहोचले, पुणे मेट्रोला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान मोदी गरवारे मेट्रो स्टेशनला पोहोचले, पुणे मेट्रोला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण
राज्यपाल कोश्यारी, अजित पवार , देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे , उदयनराजे भोसले, रामदास आठवले उपस्थित
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार, महात्मा जोतीबा फुलेंच्या पुतळ्यास अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेत पोहोचले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करणार
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पुणे महापालिकामध्ये दाखल होतील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करणार, सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी ना उपस्थित राहण्याची परवानगी
पंडित नेहरुंनंतर महापालिकेमध्ये येणारे दुसरे पंतप्रधान, मोदींच्या दौऱ्या निमित्ताने भाजप निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या दौऱ्याला विशेष महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलनातून निषेध केलाय. पुणे स्टेशनच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन छेडलंय. सर्वांनी काळे कपडे अन् काळे मास्क घालत मोदींचा निषेध वर्तवला आहे. हे पंतप्रधान देशाचे नव्हे तर फक्त भाजपचे आहेत. म्हणूनच आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते आज विकास कामांचे लोकार्पण करतायेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मात्र त्यांना फिकीर नसल्याचा आरोप यानिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय.
पुणे:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात एमआयटी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या राजबिंडा शाही फेटा घालण्यात येणार होता. या फेट्यावर राजमुद्रा देखील लावण्यात आली होती.पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे फेट्यामधील राजमुद्रा काढण्यात आली आहे.आत्ता जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेटा घालण्यात येणार आहे त्यात राजमुद्रा नसणार आहे....
पंतप्रधान मोदींच्या एमआय टी महाविद्यालयातील सभेला येणाऱ्या लोकांसाठी काळा रंग वर्ज्य ठरवण्यात आलाय. ज्यांनी काळ्या रंगाचा शर्ट घातला असेल त्यांना तो काढण्यास सांगण्यात येतंय. एवढच नाही तर ज्यांनी शर्टच्या आतमधे काळ्या रंगाचा बनियन आणि पायात काळ्या रंगाचे मोजे घातले असतील त्यांनाही ते काढण्यास सांगण्यात आलय. काळ्या रंगाचा मास्कही काढून टाकण्यास सांगण्यात येतय. मोदींच्या सभेत काळ्या रंगाचा उपयोग करून कोणी निषेध करु नये यासाठी हे करण्यात येतय.
पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ताफा पुण्यातील ज्या ज्या रस्त्यांवरून जाणार आहेत त्या प्रत्येक रस्त्याला बॅरिकेडींग करण्यात आलंय आणि सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. प्रत्येक दुकान बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद असतील

मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचे आंदोलन अलका चौकात होणार आहे तर राष्ट्रवादीकडून पुणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन, मोदी आज पुणे दौऱ्यावर विविध विकास कामाचे उद्घाटन, त्या आधीच काँग्रेसचे आंदोलन, महाराष्ट्रची माफी मागावी काँग्रेसची मागणी
पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर, दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान मोदी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करतील.
यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल. बाणेर येथे 100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही पंतप्रधान लोकार्पण करतील.
दुपारी 12 वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल.
सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.
Pune PM Narendra Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.
पार्श्वभूमी

इतर महत्वाच्या बातम्या
Pune Metro: पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; 'या' दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करणार
Sharad Pawar : आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -