अजीज शेख हा पिंपरी चिंचवडमधील पुनावळे भागातल्या एका चिकन सेंटरमध्ये कामाला आहे. निलेश ढवळे हा युवक दुकानात चिकन घेण्यासाठी आला होता. तेव्हा अजीजने एका ग्राहकाकडून 310 रुपये घेतले, तर तितक्याच वजनाच्या चिकनसाठी आपल्याकडून मात्र 410 रुपये घेतल्याचा दावा निलेशने केला.
याबाबत निलेशने जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी निलेश दुकानातील काही अंडी आणि वजनाचा काटा तोडल्याची माहिती आहे. त्यामुळे चिडलेल्या अजिजने हातातील सत्तूरने निलेशच्या डोक्यात वार केल्याचा आरोप आहे.
यामध्ये निलेश जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत, तर आरोपी अजीजला हिंजेवडी पोलिसांनी अटक केली आहे.