सातारा : मित्राला फोटो काढायला सांगून विद्यार्थ्याने पुलावरुन नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आली आहे. नुकूल डुबे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. नुकूल जावली तालुक्यातील मेढा फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे.

Continues below advertisement


नुकूल त्याचा मित्र सुरज गोळवे याच्यासोबत मोहाट या वेण्णा नदीच्या पुलावर फियायला आले होते. पुलावर येताच नुकूलने सुरजला त्याचा फोटो काढण्यास सांगितले. त्यावेळी सुरज पुलाच्या कढड्या पलिकडे उभा राहिला होता. सुजर मोबाईलवर फोटो काढत असताना नुकूलने सुरजच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि बाय म्हणत नदीत उडी मारली.


काही कळायच्या आत सगळा प्रकार घडल्याने सुरज घाबरला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. आजूबाजूचे लोक जमा झाले मात्र तोपर्यंत सुरज नदीत दिसेनासा झाला होता.


घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस महाबळेश्वर ट्रेकर्स टीमच्या मदतीनं नुकूलचा शोध घेत आहेत. पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. नुकूलने आत्महत्या का केली त्याने दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिले आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.