नंदुरबार : राज्यात आता पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. इंधनाच्या या दरवाढीमुळे नागरिक हैरान आहेत. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर गुजरातपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहन धारक आता गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. दोन राज्यात 12 किलोमीटरच्या अंतरात पेट्रोल दरात 8 ते 9 रुपयांची तफावत आसल्याने नागरिक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यास पसंती देत आहे.  

Continues below advertisement


नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याचा सीमावर्ती भागात आहे. नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचे दर 101रुपये 24 पैसे आहेत. तर नंदुरबारपासून आवघ्या 12 किलोमीटर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 93 रुपये 02 पैसे आहे. एक लीटर पेट्रोलमागे 8 ते 9 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहन धारक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. तेथून वाहनाची पेट्रोलची टाकी फुल भरली तर 100 रुपयांची बचत होत असल्याचे वाहन धारक सांगतात.  


सीमावर्ती भागातील पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रमधून पेट्रोल खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये गुजरातपेक्षा अधिकचे कर लावल्याने पेट्रोल दर अधिक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जास्त दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे राज्य सरकारने लावलेले अधिकचे कर कमी करण्याची मागणी वाहन धारकांनी केली आहे.


पेट्रोल दरवाढीवरून राष्ट्रवादीची टीका


पेट्रोलच्या किमती प्रति लिटरसाठी शंभर रुपये पोहोचल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यातील हरिनिवास सर्कल इथे एक बॅनर लावून त्यावर पांढऱ्या दाढीमध्ये एक क्रिकेटपटू दाखवला होता. या क्रिकेटपटूच्या खाली त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला होता. तसेच अच्छे दिनाच्या शुभेच्छा असे लिहिण्यात आले होतं. या बॅनरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. 


इतर बातम्या


Petrol Diesel Price : पेट्रोलच्या किमतीने गाठली शंभरी; ठाण्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी