मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा चढता आलेख खाली यायचं नाव घेत नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरात आजही वाढ पाहायला मिळाली. पेट्रोलचे दर 10 पैशांनी तर डिझेलचे दर 9 पैशांनी वाढले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून इंधनाच्या दरात सलग वाढ होत आहे.
मुंबईत पेट्रोल 89.54 रुपये लिटरने विकलं जात आहे, तर डिझेल 78.42 रुपयांवर पोहचलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे हे दर असेच कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल यात शंका नाही.
इंधन दरांवर नियंत्रण नसल्याचं सांगत सरकारने हात वर केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला रोज झळ बसत आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरकारला इशारा दिला आहे. इंधनाचे दर कमी केले नाही तर, मोदी सरकारला याचा फटका बसेल, असं बाबा रामदेव म्हणाले.
गेल्या 18 दिवसात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.54 रुपये झाला आहे.
या शहरांमध्ये पेट्रोल नव्वदी पार
सोलापूर
पेट्रोल- 90.59
डिझेल- 79.04
सातारा
पेट्रोल- 90.02
डिझेल- 77.68
अहमदनगर
पेट्रोल - 90.10
डिझेल- 77.77
जळगाव
पेट्रोल- 90.49
डिझेल- 78.14
नंदुरबार
पेट्रोल - 90.38
डिझेल - 78.05
औरंगाबाद
पेट्रोल- 90.59
डिझेल-79.48
जालना
पेट्रोल- 90.26
डिझेल- 77.92
उस्मानाबाद
पेट्रोल- 90.04
डिझेल-77.72
लातूर
पेट्रोल-90.24
डिझेल - 77.92
बीड
पेट्रोल- 90.54
डिझेल- 78.19
परभणी
पेट्रोल-91.29
डिझेल- 78.91
नांदेड
पेट्रोल- 91.11
डिझेल- 78.76
हिंगोली
पेट्रोल- 90.31
डिझेल- 78.00
नागपूर
पेट्रोल- 90.02
डिझेल- 78.95
गोंदिया
पेट्रोल- 90.60
डिझेल- 78.27
भंडारा
पेट्रोल- 90.28
डिझेल- 77.96
गडचिरोली
पेट्रोल- 90.26
डिझेल- 77.96
अकोला
पेट्रोल- 90.01
डिझेल- 77.71
वाशिम
पेट्रोल- 90.02
डिझेल- 77.72
बुलडाणा
पेट्रोल- 90.03
डिझेल- 77.73
यवतमाळ
पेट्रोल- 90.54
डिझेल- 78.23
अमरावती
पेट्रोल- 90.79
डिझेल- 79.71
सिंधुदुर्ग
पेट्रोल- 90.43
डिझेल- 78.11
रत्नागिरी
पेट्रोल- 90.55
डिझेल- 78.22
इतर शहरातील इंधनाचे दर
मुंबई
पेट्रोल- 89.54 रुपये
डिझेल- 78.42 रुपये
ठाणे
पेट्रोल- 89.39 रुपये
डिझेल- 77.06 रुपये
पुणे
पेट्रोल- 89.64 रुपये
डिझेल- 77.34 रुपये
नाशिक
पेट्रोल- 89.90 रुपये
डिझेल- 77.57
कोल्हापूर
पेट्रोल- 89.70 रुपये
डिझेल- 70.40 रुपये
संबंधित बातम्या
...तर इंधन दरवाढीचा मोदी सरकारला फटका बसेल : बाबा रामदेव
पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!
इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच