PCMC News :   चिंचवड शहराचं नाव जिजाऊनगर करा, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. भक्ती- शक्ती प्रतिष्ठानने पुन्हा एकदा शहरभर फ्लेक्स लावले आहेत. पिंपरी- चिंचवडची ओळख ही अनेकदा ‘पीसीएमसी’ म्हणून करण्यात येत आहे. भविष्यात हेच नाव पडू शकतं हे लक्षात घेऊन शहराला जिजाऊनगर नाव द्यावं अशी मागणी भक्ती- शक्ती प्रतिष्ठानचे महेश बारणे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच भक्ती- शक्ती प्रतिष्ठानने पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो फ्लेक्स लावत शहराच नाव जिजाऊनगर करण्यात यावं अशी मागणी केली होती. आता  राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड शहराचा नामांतराचा विषय पुढे आला. याकडे राजकीय नेते कसं बघतात आणि भविष्यात खरच पिंपरी- चिंचवड शहराचे नाव जिजाऊ नगर होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे.


मुंबईच बॉम्बे झालं त्याचप्रमाणे पिंपरी- चिंचवडच पीसीएमसी नाव होऊ नये. पीसीएमसी हे नाव इंग्रजी आहे. अनेकदा पिंपरी- चिंचवड हे नाव घेण्याचं टाळून व्यावसायिक किंवा परराज्यातील व्यक्ती पीसीएमसी हे नाव घेतात. यामुळे शहराच्या नावाची ओळख कमी होत असल्याचं म्हणणं महेश बारणे यांचं आहे. शहराचं नाव हे जिजाऊनगर करण्यात यावं अशी त्यांची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहराच्या नावासंदर्भात मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर या निर्णय़ाला काहींनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दर्शवला. शहरात 100 हून अधिक ठिकाणी या मागणीसाठी फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हिच मागणी पुढे येत आहे. 


pcmc हे इंग्रजी नाव घेऊन सगळे व्यापारी आज जाहिरात करताना दिसत आहेत. त्यामुळे 20 वर्षांनंतर या शहराचं नाव इंग्रजी होण्याची भीती आहे. कारण या भागात परराज्यातून आणि महाराष्ट्रभरातून अनेक नागरिक  पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या शहराचं नाव  पिंपरी-चिंचवडवरुन pcmc पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे जिजाऊ नगर नावाची मागणी केली आहे.


वारसा सांगणारं नाव आहे...

PCMC  नाव हे इंग्रजी नाव आहे. हे नाव नाही तर आपल्या महाराष्ट्र स्वराज्याची भूमी आहे. त्यामुळे वारसा सांगणारं जिजाऊ नगर हे नाव देण्याची मागणी आहे. जिजाऊंना ही मोठी आदरांजली असेल, असं  भक्ती- शक्ती प्रतिष्ठानचं म्हणणं आहे.