दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार पुण्यातील शिवाजीनगर येथील मोदीबाग घरी पोहोचले आहेत. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पवार प्रथमच पुण्यात आले आहेत.
शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार 13 ऑगस्ट रोजी सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु यावेळी पार्थ आणि सुप्रिया सुळे यांच्यातच चर्चा झाली. मात्र शरद पवार आणि पार्थ यांची भेट झाली नसल्याचं कळतं. त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बोलण्याचा निर्णय पार्थ पवार यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर पवार कुटुंबात नव्या वादाला तोंड फुटलं. मीडियासमोर शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर असल्याचं म्हटलं होतं. तसंच, पार्थ यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शिवाय शरद पवार यांच्या अजित पवार यांनीही जाहीररित्या कोणतंही वक्तव्य केललं नाही तर याविषयी आपल्याला कोणतंही भाष्य करायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले होते.
मात्र पार्थ पवार नाराज असून मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. पवार कुटुंबात वाद उफाळल्याची चर्चा सुरु होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केली आणि पार्थ यांना शरद पवारांच्या निवासस्थानी बोलावून घेतल्याचं सांगितलं जात आहे.
शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही."
संबंधित बातम्या
काका, आत्यांशी बोलून पार्थ पवार निर्णय घेणार!
आजोबांचा सल्ला आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल : सामना
'नया है वह', छगन भुजबळ यांच्याकडून पार्थ पवार यांचं वर्णन
'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट
'पक्षाला अडचणीत आणणारे बेजबाबदार वागणे टाळावे', पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख शरद पवार यांचा पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष इशारा
पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार