द्रुतगती मार्गावरून मुंबई ते पुणे प्रवास करताना चारचाकीसाठी 230 रुपये टोल आकारला जातो. मात्र राहुल रुकारी यांना मुंबईला जाताना तळेगाव टोल नाक्यावर फास्ट टॅगच्या खात्यातून 173 रुपये कट झाले. मात्र तसा मेसेज त्यांना आला नाही. त्यामुळं रोख 230 रुपये घेऊन टोल आकरला गेला. पण काही अंतरावर गेल्यानंतर 173 रुपये खात्यातून कट झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे राहुलना एकूण 403 रुपये टोल भरावा लागला. त्यामुळे पुण्याला येताना त्यांनी खबरदारी घेत खालापूरला रोख 230 रुपयांचे टोल फाडला. पण तळेगावला फास्ट टॅग स्कॅन झालं आणि पुन्हा 173 म्हणजे एकूण 403 रुपये वसूल करण्यात आले. म्हणजे राहुलला तब्बल 346 रुपये अधिक मोजावे लागले. तर सूर्यकांत पारेख यांचे मात्र मुंबईहून पुण्याला येताना फास्ट टॅगमधून खालापूरला 173 रुपये आणि तळेगाव टोल नाक्यावर 57 रुपये आकारण्याऐवजी पुन्हा 173 रुपये असा एकूण 346 रुपये टोल घेतला गेला, म्हणजे त्यांची 116 रुपयांची लूट झाली.
Inflation | महागाईचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर, सामान्यांना काय वाटतं? | ABP Majha
महामार्गावर टोल किती आकारावा, टोल वसूल करण्याची मुदत किती असावी यावर सरकार तोडगा काढू शकलेली नाही. पण याच टोल नाक्यावर वाहनांच्या रांगेत जाणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी सरकारने देशभर फास्ट टॅगची सुविधा आणली. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टटॅग बसवणे अनिवार्य आहे. फास्टटॅगमुळे 12 हजार करोड रूपयांची बचत होणार आहे. मनुष्यबळ आणि इंधनबचत याचा खर्च वाचणार आहे. तरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी फास्टटॅग बसवून घ्यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
टोल वसूल करणाऱ्या सहकार ग्लोबल कंपनीने त्यांच्याकडे याबाबत तक्रारी येत असल्याचं मान्य केलं आहे. मात्र याचं अधिकृतरीत्या स्पष्टीकरण देण्यास त्यांनी नकार दिला आहे. द्रुतगती मार्गावर आकारला जाणारा टोल आणि त्याला वारंवार दिली जाणारी मुदत वाढ हा विषय नेहमीच वादाचा ठरला आहे. आता त्यात फास्ट टॅगच्या लूटीची भर पडली आहे. द्रुतगती मार्गावरून रोज लाखभर वाहन ये जा करतात.
संबधित बातम्या :
मुंबईत बाथरुममध्ये गुदमरुन मुलीचा मृत्यू, गिझरमधील वायूमुळे दुर्दैवी अंत
रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातले लोकप्रतिनिधीच मोठा अडथळा; गडकरींचा गंभीर आरोप