Parbhani: परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी (३५) असे असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. त्यांनी या तरुणाच्या मृत्यूचं कारणही सांगितलंय. 


'अकरा तारखेला घडलेल्या प्रकारात आरोपी म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेला  सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीतच मृत्यू झाला, आज सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार त्याने जेल ऑथॉरिटीकळे केली होती. त्या आधारावर जेल ऑथॉरिटीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती केले. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ हा वडार समाजाचा असून पुणे येथे राहणारा आहे. तो दगडफेकी प्रकरणातील आरोपी होता. परभणीकरांनी शांतता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे सगळी टेक्निकल फॉर्मलिटी पूर्ण करण्यात येणार आहे. 'असे आयजी शहाजी उमाप म्हणाले.


परभणीकरांना शांततेचं आवाहन


परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सोमनाथ सुर्यवंशी असे 35 वर्षीय मृत तरुणचे नाव आहे.कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा अस्वस्थता आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर आयजी शहाजी उमाप यांनी परभणीकरांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.


नक्की झाले काय?


परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली. या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या ५० लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा कारागहातच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमनाथ सुर्यवंशी असे ३५ वर्षीय मयत तरुणचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणास मृत घोषित केले.या घटनेने परभणीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय.


हेही वाचा:


मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता