मुंबई : एखाद्या रस्त्याचे काम सुरु झाले तर साधारण किती दिवस तो रस्ता पूर्ण होण्यासाठी साधाराण तीन वर्षे लागतात. मात्र परभणी च्या जिंतुर-परभणी महामार्गाचे काम मागच्या 4 वर्षापासून सुरु आहे. आता 15 दिवसांपासून केंद्राकडे 25 कोटी थकल्याचे सांगून कंत्राटदाराने इथला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

परभणी-जिंतूर या 45 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी 272 कोटींत 4 पदरी सिमेंट रस्ता मंजूर केला. चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सुरु झाले. मात्र हे काम सुरु कमी आणि बंदच जास्त वेळा पडले. रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदून ठेवण्यात आली आहे. तर एका बाजूला तुटक तुटक अशी सिमेंट काँक्रेटचे काम झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणी येत असून जात असून पावसाळ्यात तर अनेक वाहने रस्त्याखाली गेल्याने अपघात झाले होते.

वारंवार या रस्त्याचे काम बंद पडत असल्याने जिंतूर करानी जिंतूर-परभणी महामार्ग जनआंदोलन समिती स्थापन केली. अनेक वेळ रस्ता काम बंद पडल्याने या समिती विविध आंदोलन केले आहेत. मात्र तरीही या रस्त्याच्या कामाला गती येऊन हे काम मार्गी लागेले नाही. रखडलेल्या कामाकडे ना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले ना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यामुळे 4 वर्षात केवळ 55 टक्के काम झाले. एवढेच काम या रस्त्याचे झाले असून आता तर चक्क काम बंद करून कंत्राटदाराने सर्व यंत्र सामुग्रीही हलवली असल्याने हे काम पूर्ण होणार की अशाच पद्धतीनं अर्धवट राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिंतुर-परभणी महामार्ग जनआंदोलन समिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे दाद मागणार आहे.

Assembly Elections 2019 | जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा | लेखाजोखा मतदारसंघांचा | परभणी | ABP Majha



संबंधित बातम्या : 

शिक्कामोर्तब... आता समृद्धी नव्हे तर 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग'

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक नियम मोडणाऱ्या एसटीच्या 342 चालकांवर महामार्ग पोलिसांची कारवाई