मुंबई : “मुस्लिम आरक्षण मुद्दा माझ्यासमोर मुद्दा आलेला नाही. त्यामुळे याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही,जेव्हा सरकार समोर विषय येतील तेव्हा निर्णय घेऊ”, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत मुस्लिम आरक्षण अध्यादेश काढणार अशी घोषणा केली होती. त्यामुळेच आता मुस्लिम आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्न पडला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आहे. आरक्षणप्रश्नी कोणत्याही प्रकारची आदळआपट करण्याची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच 7 मार्चला मी अयोध्येला जात आहे. श्रीराम दर्शन घेणार असल्याचंही यांवेळी त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीसह अनेक विषयांवर महत्वपूर्ण वक्तव्य केली.

100 दिवसात शेतकरी कर्जमाफी करू शकल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री पदी आल्यावर 100 दिवसात शेतकरी कर्जमाफी करू शकलो याचं समाधान असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शेतकरी कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आहे. उर्वरित यादी लवकरच येईल. तसेचं काही ठिकाणी कामाचा लोड आला आहे पण सगळीकडे व्यवस्थित काम सुरू आहे. आम्ही घाई गडबडीने काही करणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सामनाची भाषा, दिशा बदलणार नाही, संपादकीयची जबाबदारी संजय राऊतांचीच

सामनाचे संपादक बदलले असले तरी सामनाची भाषा आणि दिशा तिच राहिल असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. तसेच सामनातील संपादकीयची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेचं असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आमची अंतर्गत मांडणी आहे. मातृभाषा असते तशी पितृभाषा असते. आमची पितृभाषा ‘सामना’ची असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सामनातील संपादक पदाच्या बदलावर व्यक्त केलं