मुंबई : परमबीर सिंह यांच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह यांचा पगार थांबवला आहे.  परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही राज्य सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. 


परमबीर सिंहांविरोधात मुंबई, ठाणेसह अनेक  ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनंतर परमबीर सिंह यांना राज्य सरकार फरार घोषित करणार आहेत. पोलीस महासंचालकांनी परमबीर सिंह यांच्यासह 25 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निवेदन गृहमंत्रालयाला दिले आहे.  मात्र गृह मंत्रालयाने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या आरोप विस्तृत स्वरूपात देण्यास पोलीस महासंचालकांना सांगितलं आहे.


राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना निलंबित करण्यात निवेदन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला दिला आहे. गृह विभागाने मात्र सावध भूमिका घेत अधिकाऱ्यांवर असलेल्या आरोपांची विस्तृत माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागवली आहे.. किती गंभीर स्वरूपाचे आरोप संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहेत याची माहिती गृहमंत्रालयाला हवी आहे ज्या नंतर यावर त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येईल.


 



पोलीस महासंचालकांनी काय निवेदन पाठवलं?


ज्या अधिकारांवर गुन्हे दाखल आहेत अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निवेदन गृहमंत्रालयाला पाठवण्यात आले आहे. या निवेदनात परमबीर सिंह यांचा सुद्धा नाव आहे. या सोबतच 4 पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नावं आहेत.


गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या सूचनांनुसार पुन्हा महासंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात नव्याने निवेदन तयार करण्यात येणार असून लवकरच पुन्हा गृहमंत्रालयाकडे या अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी हे निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्यानंतर गृह मंत्रालय यावर काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे. 


संबंधित बातम्या :