बीड :  भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांना बीड लोकसभेचं (Beed Lok Sabha)  तिकीट मिळण्याची शक्यता आहे.. एका मोठ्या नेत्यानं एबीपी माझाला ही माहिती दिलीय. महायुती सरकारसोबत आलेल्या धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde)  परळी विधानसभेचं तिकीट निश्चित झाल्याचीही माहिती आहे. मुंडे बहिण-भावांमध्ये या मुद्दयावर एकमत झालंय का? बहिण-भावांमधला दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला. 


पंकजा मुंडे बीड लोकसभा आणि धनंजय मुंडे परळी विधानसभा लढणार का? महायुतीनं मुंडे बहिण-भावांमधलं जागावाटप निश्चित केलंय का? परळीतल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुंडे बहिण-भावांमधला दुरावा मिटला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना  हा दुरावा मिटवण्यासाठी खुद्द पुढाकार घेतला. शासन आपल्या दारी कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गोपीनाथगडावर गेले. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचीही उपस्थिती होती. 


देवेंद्र फडणवीसांना पंकजा मुंडेनी दिली टाळी 


 गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीतून निघाले होते. त्या गाडीचे साध्य धनंजय मुंडे करत होते. मात्र अचानक गाडी बदलण्याचा निर्णय झाला आणि सगळेजण गाडीच्या खाली उतरले. मात्र यावेळी धनंजय मुंडे यांच्या गाडीतून खाली उतरलेले देवेंद्र फडणवीस सरळ पुढे गेले आणि पंकजा मुंडे बसलेल्या गाडीमध्ये जाऊन बसले.   मात्र यावेळी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस मध्ये काहीतरी चर्चा झाली आणि या चर्चेतून फडणवीस आणि पंकजा मुंडेंना टाळी सुद्धा दिली.एवढेच नाही तर व्यासपीठावर बसल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कायम अशा पिकल्याचे चित्र पाहायला मिळत होता. व्यासपीठावर बसले असताना सुद्धा पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकमेकांना टाळी दिली. या दोन राजकीय नेत्यामधला आजचा जो काही संवाद होता तो यापूर्वीच्या विसंवादाला पूर्णविराम देणारा ठरला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. 


पंकजा मुंडेंना बीड लोकसभेची तयारी करावी लागणार?


देवेंद्र फडणवीसांनी मुंडे बहिण भावांनी एकत्र काम करण्याची विनंती थेट व्यासपीठावरुन केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनीही मान दिला आणि यापुढे एकत्र काम करण्याचे संकेत दिले. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्या आहेत. मराठवाड्यात गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार आहेत त्यामुळं पंकजांना नाराज करणं भाजपला परवडणार नाही. धनंजय मुंडे हे परळीचे विद्यमान आमदार आहेत आणि ते महायुतीचा घटक आहेत. त्यामुळं धनंजय मुंडेंना परळी विधानसभेचं तिकीट द्यावंच लागणार आहे.  त्यामुळं पंकजा मुंडेंना बीड लोकसभेची तयारी करावी लागणार आहे.


बहिण-भावांमधील तणाव दूर


भाजपचं एक कुटुंब, एक पद हे धोरण आहे. त्यामुळं प्रीतम मुंडेंच्या ऐवजी भाजप पंकजा मुंडेंना लोकसभेच्या आखाड्यात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात पंकजा आणि धनंजय मुंडेंमधला ताणतणावही दूर झाला आहेय त्यामुळं त्यांची राजकीय वाटचालही यापुढे एकत्रच होण्याची शक्यता आहे.