मुंबई : राज्यभरात राहुल गांधींविरोधात (Rahul Gandhi) भाजपनं (BJP) आंदोलनाची हाक दिलीय. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक झालीय. राज्यभर आज भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहेत. या आंदोलनात पंकजा मुंडे देखील सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांनी जी भाषा केली जोपर्यंत ते माफी मागत नाही तोवर आमचे आंदोलन सुरु राहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. राहुल गांधीनी आपल्या संविधानाचा अपमान केला, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, काँग्रस नेते राहुल गांधी यांचे भाषण बघत होते. हे लोक म्हणत होते मोदी सरकार आले तर संविधान बदलतील. आता हे लोक गरिबांचं आरक्षण काढून घेणार आहे. या लोकांच्या मनात जातीयवाद आहे. तर मविआचे नेते जातीच्या चक्कीत पिसण्याचे काम कोण करत आहे. मराठा आरक्षण घालवण्याचे काम कोणी केले तर या लोकांनी आणि हे आमच्या नेत्यांना बदनाम करत आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सहमती आहे का? पंकजा मुंडेंचा सवाल
लोकांना पोट भरण्याची योजना मोदींनी आणली. ज्यांची औकात नव्हती त्यांच्या खात्यात योजना दिल्यात. आपल्या देशाची गरिमा दुसऱ्या देशात जाऊन घालवाणारे देशाचे नेतृत्व कधीच करू शकत नाही. गरिबाला मुख्य प्रवाहात या लोकांनी कधी आणले नाही. आमच्या दहा वीस जागा कमी झाल्या तर तुम्ही एवढ्या उड्या मारता... आमचे सरकार तिसऱ्यांदा आले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सहमती आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवला : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, राहुल गांधी यांनी जी भाषा केली जोपर्यंत ते माफी मागत नाही तोवर आमचे आंदोलन सुरु राहील. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवला आहे. त्यांनी आपल्या संविधानाचा अपमान केला यावर राहुल गांधी यांनी स्पष्ठीकरणं द्यायला हवे.
राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध
छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजपनं आंदोलनाची हाक दिलीये. मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येतंय. तसंच या आंदोलनाला अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित आहेत. तर तिकडे अमरावतीत राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसंच नाशिकमध्येही आज भाजपच्या वतीने राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातही राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलं.
हे ही वाचा: