Jalana News जालना : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे आजपासून आपल्या अभिवादन दौऱ्यावर प्रारंभ करत आहेत. आज बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील माँसाहेब जिजाऊचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजे लहुजी जाधव यांच्या राजवाड्यात जाऊन ते जिजाऊंना अभिवादन करणार आहे. तसेच याच ठिकाणावरून त्यांचा अभिवादन दौरा सुरू होणार आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने ओबीसी समाज यानिमित्ताने सिंदखेड राजा येथे आज ओबीसींच शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या काही दिवासांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, याबाबत लक्ष्मण हाके यांनी भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी आम्हाला कोणीही दान म्हणून ते करू नका, भूतदया दाखवू नका, तो आमचा हक्क आहे. इथल्या तरुणांच्या त्या भावना आहेत. आमचा ओबीसी जसा-जसा बाहेर येईल, एकत्र येईल, तसा- तसा महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सर्व गोष्टींचा प्रभाव पडेल. ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला अशी खात्री असल्याचा विश्वासही
बहुजनांना, ओबीसींना न्याय मिळेल तो दिवस सामाजिक न्याय दिवस
राजश्री शाहू महाराजांची आज जयंती असून शासनाकडून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. न्याय दिन साजरा केला जात असेल तर शाहू महाराजांनी उभी हयात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी घालवला आहे. त्यामुळे ज्या दिवशी बहुजनांना, ओबीसींना न्याय मिळेल त्या दिवशी सामाजिक न्याय दिवस साजरा झाला असे मी म्हणेल. अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी बोलताना दिलीय.
हार तुरे, जेसीबी लावण्यापेक्षा संवाद साधणे महत्त्वाचे
आज मातृतीर्थ सिंदखेडराजा आणि पोहरादेवी येथे आम्ही जाणार असून उद्या आम्ही गोपीनाथ गड आणि भगवानगडावरती जाणार आहोत. आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावातून, वाड्या -वस्तीवरून, तांडातून लोक आमच्याकडे येत होती. आमचे उपोषण संपलं तरी आजूबाजूच्या गावची लोक अजूनही तिथे येत होती. त्या सर्वांच्या आग्रहखातर आम्ही हा दौरा करत आहोत. हार तुरे, जेसीबी लावण्यापेक्षा संवाद साधणे महत्त्वाचा आहे. हा शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही तर आमच्या हक्क आणि अधिकार वाचवणे हा आमचा उद्देश असल्याचे ही लक्ष्मण हाके म्हणाले.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या न्यायाने आताचे राज्य चालत नाही- नवनाथ वाघमारे
महाराष्ट्र म्हणजे काय आहे? एका व्यक्तीच्या बडबड करणाऱ्याचा तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्र बघितला आहे. मात्र आता अठरापगड जातीचा, बारा बलुतेदारांचा, भटक्या विमुक्तांचा महाराष्ट्र आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. महामानवाने सामाजिक न्याय देण्याचे काम केलं. त्या ठिकाणी जाऊन बहुजनांना ऊर्जा मिळेल. आम्ही फक्त आमच्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी झटत आहोत. फुले शाहू आंबेडकरांच्या न्यायाने आताचे राज्य चालत नाही,अशी खंतही नवनाथ वाघमारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या