बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून या संबंधित माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आपण विलगीकरणात असल्याचं सांगितलंय. तर 'ताई लवकर बरी हो' अशी भावनिक साद बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घातली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलंय की, "माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी त्या संदर्भात खबरदारी घेत आहे. मी या आधी अनेक कोरोनाबाधित लोकांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे, त्यामुळेच मला लागण झाली असेल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी. काळजी घ्या".
पंकजा मुंडेच्या या ट्वीटवर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या."
महत्वाच्या बातम्या :
- काँग्रेसकडून राज्याला मदतीचा 'हात'; वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा बाळासाहेब थोरातांचा निर्णय
- Coronavirus: भारत परकीय मदत स्वीकारणार, कोरोनामुळे 16 वर्षानंतर धोरणात मोठा बदल
- Third COVID-19 Wave | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची तयारी सुरु, ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याचं लक्ष्य