सोलापूर : विठ्ठल मंदिरात भाविकांच्या निवाऱ्यासाठी नवा मंडप उभारण्यात आलंय. मंदिरातील बाजीराव पडसाळी इथं हा मंडप उभारण्यात येणार आहे. संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने हळव्या वजनाचे लोखंड व पत्र्यांचा वापर करून या मंडपाची उभारणी केली जातेय. त्यामुळे भाविकांना आता काही काळासाठी मंदिरात थांबायला एक चांगली जागा उपलब्ध होणार आहे .   


विठुरायाच्या दर्शन घेतल्यानंतर देवाच्या दारात क्षणभर विसावा घ्यावा आणि आपला आनंद व्यक्त करावा यासाठी मंदिरात आता एक नवीन मंडप मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे उभारण्यात आला आहे. सध्या मंदिराच्या संवर्धनाचे जे 73 कोटीचे काम सुरु आहे त्यातच हा मंडप उभारण्यात येत आहे . संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने हळव्या वजनाचे लोखंड व पत्र्यांचा वापर करून या मंडपाची उभारणी केली जात आहे . याची उंची मंदिराच्या आकाराला साजेशी ठेवल्याने या ठिकाणी भाविकांना ऊन आणि पावसाचा कोणताही त्रास जाणवणार नाही.


आकर्षक मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात


विठ्ठलाचे दर्शन घेऊन  भाविकांना आता विश्रांती घेता येणार आहे . मंदिरातूल महालक्ष्मी मंदिराशेजारी असणाऱ्या या बाजीराव पडसाळी या परिसरात  पूर्वी सिमेंट काँक्रेटचा स्लॅब होता . या वजनाने मंदिराला धोका होऊ लागून मंदिराचे दगड निसटायला सुरुवात झाली होती . संवर्धनाचे काम करताना सिमेंटची सर्वच बांधकामे पडून टाकण्यात आली आणि येथे हा आकर्षक मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देवाचे दर्शन झाल्यावर भाविक या ठिकाणी विसावा घेऊन नंतर भजन कीर्तने म्हणू शकतील याच पद्धतीने महिला फुगड्या खेळून आपला आनंद साजरा करू शकतील. याच्या शेजारी पूर्वीच्या दगडी ओवऱ्याना आता पुन्हा मूळ 700 वर्षांपूर्वीच्या दगडी रूपात आणले असून या ओवऱ्यावर भाविक विश्रांती घेऊ शकणार आहेत . पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या कामामुळे भाविकांना आता थोडावेळ मंदिरात थांबायला एक चांगली जागा उपलब्ध होणार आहे .


विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार


 विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचे सुरु असलेल्या कामांपैकी गाभारा , चौखांबी , सोळखांबी, बाजीराव पडसाळी वगैरे भागाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 2 जून पासून भाविकांना विठुरायाचे मूळ दगडी गाभाऱ्यात तर दर्शन घेता येणारच आहे. शिवाय  विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार आहे.  


हे ही वाचा :


Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या गुप्त खोलीचे गूढ उलगडले, 3 पुरातन मोठ्या मूर्ती आणि काही इतर लहान मूर्ती