मुंबई: महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी पंचायत समिती उमेदवारांची आर्थिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर केली आहे.

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये ११८ पंचायत समितीयांची निवडणूक होत आहे. एकूण १२८८ जागांसाठी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी ५१६६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ३५२२ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती जाहीर करण्यात आली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

  • गुन्हेगारी प्रकरणं असलेले उमेदवार: ३५२२ उमेदवारांपैकी १८३ (५%) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे घोषित केले आहे.

  • गंभीर गुन्हेगारी प्रकरण असलेले उमेदवार: वरील ३५२२ उमेदवारांपैकी १२७ (४%) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे ज्यामध्ये खूनखुनाचा प्रयत्नबलात्कारअपहरणदरोडादादागिरी,फसवणूक, इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे.

  •  भाजपाच्या 691 विश्लेषण केलेल्या उमेदवारांपैकी 4% उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत..

  • - शिवसेनेच्या  629 विश्लेषण केलेल्या उमेदवारांपैकी 5% उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत..

  • - राष्ट्रवादीच्या  572 विश्लेषण केलेल्या उमेदवारांपैकी 5% उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • - काँग्रेसच्या 513 विश्लेषण केलेल्या उमेदवारांपैकी 2% उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत..

  • - पंचायत समितीत जनसुराज्य शक्ती,संभाजी ब्रिगेड आणि कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी या  तिघांकडून लढत असलेल्या उमेदवारत प्रत्येकी 20 % उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत

  • - स्वाभिमानी पक्ष,भारतीय शेतकरी कामगार पक्ष,आरपीयाय,ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया या तिघांकडून लढणार्‍या उमेदवाराविरुद्ध एकही गंभीर गुन्हा नाही.


आर्थिक पार्श्वभूमी


कोट्यधीश उमेदवार: ३५२२ पैकी ४५७ (१३%) उमेदवार कोट्यधीश आहेत.

  • सरासरी मालमत्ता: पंचायत समितीयांच्या निवडणुकीच्या २०१७ मधील दुसऱ्या टप्पयासाठी विश्लेषित केलेल्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु. रु. ५९ लाख इतकी आहे.

  •  शून्य मालमत्ता असलेले उमेदवार: विश्लेषित केलेल्या३५२२ उमेदवारांपैकी  उमेदवारांनी शून्य मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे.

  • कमी मालमत्ता असलेले उमेदवार: एकूण५२० उमेदवारांनी रु.२,००,००० (दोन लाख) पेक्षा कमी मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे (शून्य मालमत्ता असल्याचे घोषित केलेले उमेदवार सोडून).

    विश्लेषित केलेल्या ३५२२ पैकी ४५७ (१३%) उमेदवार कोट्यधीश आहेत.


पक्षनिहाय कोट्यधीश उमेदवार


- राष्ट्रवादीच्या विश्लेशीत केलेल्या 572 उमेदवारांपैकी 127 उमेदवार अर्थात 22% उमेदवार कोट्यधीश आहेत..

- भाजपाच्या विश्लेशीत केलेल्या 691 उमेदवारांपैकी 85 उमेदवार अर्थात 12% उमेदवार कोट्यधीश आहेत..

- काँग्रेसच्या विश्लेशीत केलेल्या 513 उमेदवारांपैकी 80 उमेदवार अर्थात 16% उमेदवार कोट्यधीश आहेत..
- सेनेच्या विश्लेशीत केलेल्या 629 उमेदवारांपैकी 76 उमेदवार अर्थात 12% उमेदवार कोट्यधीश आहेत..
- लोकशाही क्रांति आघाडीने एकाच उमेदवार उभा केला असून हा उमेदवार कोट्यधीश आहे.

- पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी चे 43% उमेदवार कोट्यधीश आहेत.

- कोल्हापूर जिल्हा तारारणी विकास आघाडीचे 40% उमेदवार कोट्यधीश आहेत.

- सीपीआय पक्षाकडे सर्वात कमी अर्थात केवळ 4% कोट्यधीश उमेदवार आहेत.