पालघर : कोणत्याही कुटुंबात एखादे लग्न असेल तर लग्नपित्रका ही आलीच. त्यातही आज डोळे दिपविणाऱ्या महागड्या लग्नपत्रिकांचा ट्रेंड आहे. नातलग, परिचितांकडून आलेली लग्नपत्रिका कितीही छोटी असो की मोठी, वाचून झाल्यावर किंवा ते लग्न झाल्यावर तिचा उपयोग काहीच नसतो. त्यामुळे साहजिकच ती फेकून दिली जाते. अनेकदा तर लग्नाच्या दिवसापर्यंतही ती पत्रिका आठवणीत राहात नाही. त्यामुळे त्या पत्रिकांवर असलेल्या देवी देवतांची ही विटंबना होते.


तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावरूनही लग्नपत्रिका पाठविली जात आहे. ती संग्रही ठेवण्याचा प्रश्न उरत नाही, परंतु या सगळ्या प्रकारांना शह देत एका पोलीस हवालदार आलेल्या डामसे दाम्पत्याने कापडी पिशवीवर आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका छापली आहे.



मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य अभिनेत्री देत आहेत बॉलिवूडकरांना टक्कर


पोलीस हवालदार असलेल्या रवींद्र डामसे यांची मुलगी रविना हिचा विवाह 15 मार्च रोजी संपन्न होणार आहे . या साठी त्यांनी कागदी पत्रिकेऐवजी थेट कापडी पिशवीवरच लग्न पत्रिका छापली आहे . जेणेकरून या पिशवीचा वापर हा देण्यात येणाऱ्या आमंत्रितांना नेहमी करता यावा. अतिशय वेगळ्या आणि आकर्षक अशा या संकल्पनेमुळे सध्या ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे.