Palghar rickshaw Video Viral : सोशल मीडिया आजकाल कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. व्हायरल व्हायला कंटेटही तसा दमदार असला पाहिजेच. असाच एक जबरदस्त व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एक रिक्षाचालक चक्क रिक्षा घेऊन (rickshaw Video Viral) पादचारी पुलावरुन जात असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे पालघरचा. पालघरच्या मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रॉस करण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पादचारी पुलाचा वापर केला आहे.
पादचारी पुलावरून चाललेला रिक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यावर अनेक कमेंट आणि लाईक्सचा तर पाऊसच पडतोय. पालघर जिल्ह्यातील भारोल या गावाच्या परिसरात हा पादचारी पुल आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग ओलांडण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पब्लिक ब्रिजचाच वापर केला आहे.
तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर या रिक्षाचालकाच्या ब्रिजवरील व्हिडीओला आजच्या राजकारणाचासंबंध जोडून तो सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडीओचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. असल्यास केवळ योगायोग समजावा, असं आमदार मिटकरी यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर भारोल हद्दीत आजूबाजूच्या लोकांना महामार्ग क्रॉस करण्यासाठी हा पादचारी पुल बांधलेला आहे. पण या रिक्षा चालकाच्या या व्हायरल व्हिडिओने हा ब्रिज चांगलाच चर्चेत आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या